आजची तरुणाई : दशा आणि दिशा

     खरं आहे..! आजच्या जगात देशाला विकसित करणारा एकमेव सक्षम  म्हणून तरूणाईकडे बघितले जाते. सामाजिक जबाबदारी, घरची असलेली जिम्मेदारी व स्वप्नांचा पाठलाग करताना नेहमी चिंतेत तुर असणाऱ्या या तरूणाईपुढे काय आदर्श आहे? हा प्रश्न कधी आपल्याला पडला आहे का❓
     जर एखाद्या वयस्कर माणसाला हा पश्न विचारला असावा तर त्यांचे उत्तर नेमकं हेच असेल की आपण अजूनही नकारात्मक दृष्टीकोन फेकून न देता समानता आणि बंधुभावाच्या सिध्दांतावर विश्वास ठेवत नाही आहे. खरं सांगायचं झालं तर आपल्याला नित्यंत आवश्यकता आहे ती भावनात्मक शुध्दीकरणाची...! 
     एकीकडे एकविसाव्या शतकाच्या स्वागताची उत्कंठा लागलेली असतांना. या शतकातील कित्येक वर्षे निघून गेले. समोर प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असतांना  माझ्यामते तरी वेळेचा अभाव आपल्याला जाणवला नसेल. कारण अप्रत्यक्षित असणाऱ्या या जीवनात जगत असताना आपण घालवत असलेला वेळेचा कुठेतरी सतउपयोग होत आहे का❓हा प्रश्न ं किंचित तरुणांनाच पडला असावा. याचं कारण म्हणजे त्यांना  कुठेतरी  वेळेचा विसर पडला असावा असं म्हटलं तरी हे भाबडेपणाचे ठरणार नाही..!
           वेळ ही अगदी वाळुप्रमाणे आपल्या हातातून निसटून जात असतांना या जीवनात नेमकं पुढे काय होणार? आपण समोर काय करावं? स्वत: करत असलेल्या गोष्टी योग्य आहे का❓  आपण कधी या प्रश्ननांचा सुध्दा विचार नसेल केला. कारण हल्ली तरुणांचा प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदललेला दिसुन येईल. आजचा तरूण वर्ग हा कुठेतरी विचारांनी दिशाहीन आणि भरकटलेला दिसून येईल.  याच स्पष्टीकरण दयायच झालं तर रोज नवीन काही तरी अकल्पित घडतांना दिसुन येत आहे. याचा तरुण पिढीवर काय प्रभाव पडेल  हे एक आव्हान निर्माण होतांना दिसुन येत आहे.
   एकंदरीत सांगायच झालं तर हल्ली सगळ्यांना सगळ कळतं परंतु आजचे तरूण ग्रेट आहे, स्मार्ट आहे, स्वतंत्र आहे, आभिमानी आहे वगैरे पोकळं...! आपण शब्दांखाली चुकांना का झाकून ठेवायचं.
       या सर्व गोष्टींचा लक्षपूर्वक विचार केला तर आपल्याला गरज आहे ती 1) आत्मपरीक्षण 2) अध्यात्माच्या विकासाची आता प्रश्न उद्भवणार की अध्यात्मा म्हणजे नेमकं काय❓सरळ  शब्दात सांगायचं झालं तर  स्वतः च्या आत्म्याचं केलेलं सजग परीक्षण..!  म्हणजे अध्यात्मा होय. आता तरी लोक आपल्याला त्याचा वेगळा अर्थ दाखवत आहे. आपल्या दैनंदिन व्यतीत कामातून एकांत साधुन सकारात्मक विचारांनी  तेवढ पाईक बनायला हवं व स्वत:च कुठेतरी आत्मपरीक्षण करायला हवं.
       We Don't Need Followers We need Ideals हे एक प्रसिद्ध वाक्य आपल्याला भरपुर काही सांगून जाते. ज्यामुळे  यासारख्या महान व्यक्तीच्या विचारातून आपल्याला काही शिकता येईल. कोणतेही आव्हान हे समस्येची निगडित असते. त्यावर गांभीर्याने विचार होण आवश्यक आहे. परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी तरुणांनी सर्तक होणे गरजेचे आहे...! 

           

                                                            अनिकेत क. राऊत



Comments