आजची तरुणाई : दशा आणि दिशा
खरं आहे..! आजच्या जगात देशाला विकसित करणारा एकमेव सक्षम म्हणून तरूणाईकडे बघितले जाते. सामाजिक जबाबदारी, घरची असलेली जिम्मेदारी व स्वप्नांचा पाठलाग करताना नेहमी चिंतेत तुर असणाऱ्या या तरूणाईपुढे काय आदर्श आहे? हा प्रश्न कधी आपल्याला पडला आहे का❓ जर एखाद्या वयस्कर माणसाला हा पश्न विचारला असावा तर त्यांचे उत्तर नेमकं हेच असेल की आपण अजूनही नकारात्मक दृष्टीकोन फेकून न देता समानता आणि बंधुभावाच्या सिध्दांतावर विश्वास ठेवत नाही आहे. खरं सांगायचं झालं तर आपल्याला नित्यंत आवश्यकता आहे ती भावनात्मक शुध्दीकरणाची...! एकीकडे एकविसाव्या शतकाच्या स्वागताची उत्कंठा लागलेली असतांना. या शतकातील कित्येक वर्षे निघून गेले. समोर प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असतांना माझ्यामते तरी वेळेचा अभाव आपल्याला जाणवला नसेल. कारण अप्रत्यक्षित असणाऱ्या या जीवनात जगत असताना आपण घालवत असलेला वेळेचा कुठेतरी सतउपयोग होत आहे का❓हा प्रश्न ं किंचित तरुणांनाच पडला असावा. याचं कारण म्हणजे त्यांना कुठेतरी वेळेचा विसर पडला असावा अस...